आदिवासी कलावंताना मिळेल का न्याय?

आदिवासी कलावतांवर उपासमारिची वेळ

आदिवासी समाजाची झाली विशिष्ट बैठक

कुडाळ

लॉकडाऊन कालावधीत आदिवासी कलाकार मंडळींवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळावी, याकडे शासन व पालकमंत्री यांचे लक्ष वेधण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कला व संस्कृती यासाठी प्रसिद्ध असणारा जिल्ह्यातील ठाकर समाज सध्याचा कालखंडात प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. त्यांच्या या अवस्थेकडे सरकारने पूर्ण पणे पाठ फिरवली आहे. गेले सहा महिने लॉकडाऊनमुळे सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे आदिवासी कलाकार मंडळी वर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळावी तसेच इतर कलाकारांच्या असणाऱ्या विविध गरजा पूर्ण कराव्यात, यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा सर्व कलाकार कडून होत आहे. याबाबत दायती लोककला संवर्धन अकादमीचे अध्यक्ष व राष्ट्रपती पुरस्कार विजेते लोककलावंत गणपत मसगे यांच्या अध्यक्षतेखाली कलावंताची बैठक झाली. या बैठकीस ज्येष्ठ कलावंत सुरेश रणसिंग, तुळशीदास मसगे, शिवदास मसगे, दिनेश पांगुळ, आनंद ठाकूर, भास्कर चव्हाण, तेजस मसगे, पिंगुळी गावचे उपसरपंच सागर रणसिंग उपस्थित होते. या बैठकीत गणपत मसगे यांनी मार्गदर्शन केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 14 =