You are currently viewing बाळासाहेब, उद्धवजी ठाकरे नसते तर माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला नसता- आ. वैभव नाईक

बाळासाहेब, उद्धवजी ठाकरे नसते तर माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला नसता- आ. वैभव नाईक

*कळसुली, जानवली, कलमठ जि. प. मतदारसंघाच्या बैठका संपन्न*

*कळसुली विभागप्रमुख पदी चंदू परब, जानवली विभागप्रमुख पदी सुदाम तेली*

 

शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेब, उद्धवजी ठाकरे यांनी सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांना विविध पदे बहाल केली. मात्र काहींनी आता त्यांचा विश्वासघात केला. बाळासाहेब, उद्धवजी ठाकरे नसते तर माझ्यासारखा कार्यकर्ता कधी आमदार झाला नसता. आता आमदार खासदार शिवसेनेतून फुटून गेले असले तरी शिवसैनिक व महाराष्ट्रातील जनता उद्धवजींच्या पाठीशी आहे. सत्तेसाठी भाजप लोकशाहीची हत्या करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबला आहे. जिल्ह्यात आपली लढाई हि राणेंविरुद्ध आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवा येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला विजय हवा आहे. असे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले.

आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत,शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कळसुली जी. प. विभागाची बैठक ओसरगाव गवळवाडी येथील सदा मोरे यांच्या घरी तसेच जानवली विभागाची बैठक जानवली ,सखलवाडी येथील सत्यवान राणे यांच्या घरी व कलमठ विभागाची बैठक कलमठ येथील विलास गुडेकर यांच्या घरी काल मंगळवारी संपन्न झाली. याप्रसंगी कळसुली जि. प. विभागप्रमुख पदी चंदू परब, ओसरगाव उपविभागप्रमुख पदी शरद साळवी, कळसुली उपविभागप्रमुख पदी रवी सावंत, जानवली जि. प. विभागप्रमुख पदी सुदाम तेली यांची निवड करण्यात आली.

*सतीश सावंत म्हणाले,* शिवसेनेचे आमदार, खासदार फोडून शिवसेना कमकुवत करणे हे भाजपचे षडयंत्र आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा भाजपचा डाव आहे. या पापात शिंदे गट सहभागी झाला आहे. मात्र शिवसेनेची संघटना आणखी मजबूत करण्यासाठी सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्हापरिषद हि एका कुटूंबाकडे आहे. येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला बदल घडवून जि. प. वर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. शिवसैनिक आणि सिंधुदुर्गची जनताच परिवर्तन करू शकते हे आमदार वैभव नाईक यांना निवडून देऊन कुडाळ मालवण वासियांनी दाखवून दिले आहे. नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांची कामे करणे या गोष्टीवर भर देणे गरजेचे आहे. जनतेशी संपर्क कसा ठेवायचा हे आ. वैभव नाईक यांच्याकडून शिकले पाहिजे असे सतीश सावंत यांनी सांगितले.

*संदेश पारकर म्हणाले,* इतर आमदारांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली असली तरी आ. वैभव नाईक यांनी निष्ठा जपली आहे. उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा नव्याने उभारी घेत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विजय मिळविण्यासाठी आतापासूनच कामाला लागा. गावागावात जाऊन शिवसेना संघटना वाढीसाठी मेहनत घ्या. सभासद नोंदणीवर भर द्या. असे आवाहन संदेश पारकर यांनी केले.

यावेळी ओसरगाव येथे उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सचिन सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुका प्रमुख राजू राणे, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, ऍड हर्षद गावडे, सुशांत दळवी, वागदे सरपंच रुपेश आमडोसकर, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, प्रमोद सावंत, रवी सावंत, सदा मोरे, निलेश सावंत, संतोष गुरव, उमेश गुरव, विलास सावंत, शिरीष घाडीगावकर, शरद सरंगले, पांडु कारेकर, उदय सावंत, महेश वारंग, उत्तम राणे, नंदू गावडे, सुभाष परब, सहदेव नाईक, विष्णू ठाकूर, विकास गुरव, नंदकिशोर परब, आदित्य मोरे, दशरथ शिंदे आदी

जानवली येथे उपतालुकाप्रमुख महेश कोदे, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, शशिकांत गुरव, हुमरठ सरपंच दिलीप मर्ये, जानवली विभागप्रमुख सुदाम तेली, अरविंद राणे, सत्यवान राणे, भालचंद्र दळवी, सागर गवाणकर, व्यंकटेश वारंग, निखिल साटम, पांडुरंग मेस्त्री, बाबू घाडी, दादा भोगले, अमोल राणे आदी

कलमठ येथे उद्योजक रामू विखाळे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, विभागप्रमुख अनुप वारंग,कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री, उपसरपंच वैदेही गुडेकर, ग्रामपंचायत सदस्य राजू राठोड, बाळू मेस्त्री, विनायक सावंत, विलास गुडेकर, विनय हडकर, अनंत कदम, एजास शेख, राजू कोरगावकर, संदीप कांबळी, सुहास राणे, अर्चना कोरगावकर, स्वरा कांबळी, पंकज चिंदरकर आदींसह शिवसैनिक मोठया सख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा