You are currently viewing असलदे गावात स्वातंत्र्य सैनिक,पत्रकार,माजी लोकप्रतिनिधीचा होणार सन्मान..

असलदे गावात स्वातंत्र्य सैनिक,पत्रकार,माजी लोकप्रतिनिधीचा होणार सन्मान..

अमृत महोत्सवानिमित्त आयोजन; सरपंच पंढरी वायंगणकर यांची माहित

कणकवली 

अमृत महोत्सवानिमित्त असलदे ग्रामपंचायतच्यावतीने असलदे गावात स्वातंत्र्य सैनिक,पत्रकार,माजी लोकप्रतिनिधीचा,गुणवतांचा सन्मान करण्यात येणार आहे.ग्रामसभेत या विविध विषयांवर नियोजन करण्यात आले आहे.घरोघरी झेंडा लावण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोफत झेंडा वाटप करण्यात असल्याची माहिती सरपंच पंढरी वायंगणकर यांनी दिली.या ग्रामसभेत उपस्थित नागरिकांना झेंडा कसा लावण्यात यावा? याबद्द्ल झेंडा दाखवून मार्गदर्शक करण्यात आले.

यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, ग्रा.पं. सदस्य दिनकर दळवी, सौ. संचिता नरे, सौ. निकिता तांबे, श्रीम. वंदना हडकर, ग्रामसेवक आर. डी. सावंत, तंटामुक्त अध्यक्ष बाबाजी शिंदे, पोलीस पाटील सावित्री पाताडे, माजी सोसायटी चेअरमन प्रकाश परब,तंटामुक्त सचिव रघुनाथ लोके, आरोग्य सेविका , अंगणवाडी सेविका मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

गावातील प्रत्येक कुटुंबाला ओला कचरा व सुका कचरा गोळा करण्यासाठी डसबिन वाटप करणे.झेंडा प्रत्येक कुटुंबाला मोफत देणे.माजी सैनिकांचा सत्कार करणे.१० व १२ वी च्या गुणवतांचा सत्कार,गावातील पत्रकारांचा सत्कार करणे. गावातील माजी सभापती / उपसभापती व माजी सरपंच यांचा सत्कार करणे.किशोरवयीन मुलींना सॅनिट्रायझर वाटप करणे. गावातील शासकीय इमारत ग्रामपंचायत शाळा, अंगणवाडी यांना विद्युत रोषणाई करणे या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा