*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखिका कवयित्री रेखा काळे लिखित अप्रतिम काव्यरचना*
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
चला साजरा करु
घरोघरी तिरंगा हा
डौलाने फडकवू. !!
त्याग, शांती, समृद्धी
शिकवण देई तिरंगा
अशोकचक्रा सारखे
गतिमानही होऊ !!
तिरंगा आपली शान
भारतीयांचा अभिमान
स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचे
बलिदान हे स्मरू!!
धर्म,वेश, भाषा
नानाविध ही जरी
विविधतेतून एकता
सारे अंगीकारु !!
जण गण मन
राष्ट्रगीत आपले
राष्ट्रप्रेमाने सुरात
चला उत्स्फूर्त गाऊ !!
भारत माता की जय
जयघोष हा निनादू
राष्ट्रभक्तीची ज्योत
मनामनात पेटवू !!
रेखा बाजीराव काळे
अहमदनगर
8830793225