You are currently viewing कारगिल विजय दिन

कारगिल विजय दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”कारगिल विजय दिन”*

 

कारगिल युद्ध वीरांना करू अभिवादन
सर्व विश्वात भारताचा राखिला सन्मान।।ध्रु।।

शत्रूला चारले खडे शूरवीर सैन्यानं
लढले सैनिक प्राणांची बाजीच लावून
त्या शहिदांचे करू स्मरण करू वंदन।।1।।

देशासाठी निधडेपणे केले बलिदान
थोपवले शत्रूला सरहद्दी केले रक्षण
शत्रूला लाविले परतवून आणिले शरण।।2।।

त्या वीरांचा कुटुंबीयांचा करू सन्मान
ज्यांच्यामुळे आहोत सुरक्षित सुखी आपण
त्यांना करू मनानं आदरांजली अर्पण।।3।।

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन 410201.
Cell 9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा