You are currently viewing आमदार दीपक केसरकर राज्याच्या मंत्रिमंडळात

आमदार दीपक केसरकर राज्याच्या मंत्रिमंडळात

*कॅबिनेट मंत्रीपदी बढती; मिळणार सिंधुदुर्ग विकासाला गती, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह*

 

सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सावंतवाडीचे सुपुत्र दीपक केसरकर यांची शिंदे-फडणवीस यांच्या युतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री लाभला असून हक्काचा पालकमंत्री मिळणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते म्हणून आमदार दीपक केसरकर यांनी जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली होती आणि शिंदेंगटाची बाजू जनतेसमोर योग्य पद्धतीने मांडून महाराष्ट्राच्या घराघरात पोचले होते. त्यामुळे दीपक केसरकर यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद येणार हे जवळपास निश्चितच होते.

मागील युतीच्या सरकारमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सर्वाधिक निधी दीपक केसरकर यांनी जिल्ह्यात आणला होता. मागील सरकारमध्ये राज्यमंत्री असून देखील जिल्ह्यात विकासनिधी मोठ्या प्रमाणात आणल्याने यावेळी कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळालेल्या दीपक केसरकर यांच्याकडून जिल्हावासीयांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. सावंतवाडीचे नगराध्यक्ष असताना सावंतवाडी शहराचा केलेला विकास पाहता केसरकर नक्कीच आपल्या मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी करतील यात शंकाच नाही.

नाम.दीपक केसरकर हे शिंदेगटाचे वजनदार नेते म्हणून ओळखले जातात, पर्यटनाविषयी त्यांचा असलेला अभ्यास पाहता त्यांच्याकडे पर्यटन खाते सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. कोकण हे निसर्गसौंदर्याने नटलेलं आहे, पर्यटनदृष्ट्या जिल्ह्याचा विकास होण्यास मोठा वाव आहे. जर पर्यटनदृष्ट्या कोकणचा विकास झाला तर जगाच्या नकाशावर कोकणचे नाव दिमाखात झळकणार आणि नाम.दीपक केसरकर यांच्याकडे पर्यटन खाते आले तर नक्कीच कोकण जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्यास सुरुवात होईल यात तिळमात्र शंका नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − five =