You are currently viewing माणगाव येथे उद्या टेंब्ये स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सव

माणगाव येथे उद्या टेंब्ये स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सव

कुडाळ :

 

आषाढ शुद्ध प्रतिपदा गुरुवार ३० जून रोजी माणगाव येथे श्री प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात श्री दत्त मंदिर मध्ये सकाळी अभिषेक, पूजा, लघुरुद्राभिषेक. दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद. श्रींचे जन्मस्थानी सकाळी अभिषेक पूजा, यतीआराधना, तीर्थराजपूजन. दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद. सायं. ५ ते ६.३० वा. ह.भ.प. भास्कर मुंडले(तेंडोली) यांचे कीर्तन. सायं. ७ वा. आरती ,७.१५ वा. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट दाखविला जाणार आहे. यावेळी क्षेत्र औदुंबर येथील श्री.प.प. वामनानंद सरस्वती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन श्री दत्त मंदिर ,विश्वस्त मंडळ माणगाव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − nine =