गणपती आले, गणराया आले. . .
गणपती आले, गणराया आले,

गणपती आले, गणराया आले. . .

गणपती आले, गणराया आले,
घरोघरी बाप्पांचे स्वागत झाले..!!धृ!!
ढोल ताशे वाजले, फटाके फुटले,
नाचू गाऊनीया घरी वक्रतुंड आणले,
गणपती आले…. !!१!!
मंडपी सजविली, हार तुरे बांधले,
पिवळे पितांबर नेसूनी लंबोदर बैसले,
गणपती आले…. !!२!!
आसनावरी माझे गजवक्र सजले,
गौरी-महादेव बाजूसी, विराजमान जाहले,
गणपती आले…. !!३!!
दिव्या, दिपांची सारी रोषणाई केली,
रांगोळीचे सडे दारी तोरणं बांधिले,
गणपती आले…. !!४!!
मंत्र घोषात गणेशाचे पूजन जाहले,
धूप आरतीने तुज भावे ओवाळीले,
गणपती आले…… !!५!!
गोडधोड नैवेद्य, एकदंता अर्पिले,
भजनात विकटाच्या भक्त हे दंगले,
गणपती आले, गणराया आले,
घरोघरी बाप्पांचे स्वागत झाले…!!६!!
(दिपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा