You are currently viewing पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळांमध्ये बदल

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळांमध्ये बदल

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 व श्रेणी 2, फिरते पशुवैद्यकीय दवाखाने यांच्या कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता या सर्व दवाखाने व चिकित्सालयांच्या वेळा पुढील प्रमाणे असणार आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 4.30 पर्यंत कामकाजाची वेळ असेल. तर शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कामकाजाची वेळ  आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पाशुपालक, शेतकरी यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या तसेच कार्यालयांच्या बदललेल्या वेळांची नोंद घ्यावी. तसेच जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 व श्रेणी 2 मध्ये नवीन कामाकाजाच्या वेळेत त्यांची जनावरे पशुवैद्यकीय सेवा सुविधा, उपचार किंवा कृत्रिम रेतन किंवा अनुषंगिक बाबीकरिता घेऊन यावीत असे अवाहन  डॉ. डी.ए.शिंपी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 15 =