You are currently viewing सावंतवाडी तहसिलदार शेतकऱ्यांच्या दारी

सावंतवाडी तहसिलदार शेतकऱ्यांच्या दारी

शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

सावंतवाडी

सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी मळेवाड कोंडूरे ग्रामस्थांना पीक पाहणी संदर्भात कशी नोंदणी करायची याची माहिती दिली.
शेतकरी व सातबारा धारकाला आपल्या सातबारामध्ये पीक पाहणी ची नोंद स्वतःला करता यावी यासाठी शासनाकडून पीक पाहणी कशी करता करता येते या संदर्भात ठिकाणी मार्गदर्शन शिबिरे किंवा मेळावे आयोजित करून शेतकऱ्यांना व सातबारा धारकांना त्याची माहिती दिली जाते.तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार व महसूलचे कर्मचारी व अधिकारी या पीक पाणी संदर्भात शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत आहेत. ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे ची विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी उपस्थित राहून मोबाईल द्वारे आपल्या सातबारा मध्ये पीक पाहणी ची नोंद कशी करता येते याचे प्रात्यक्षिक दाखवून त्या ठिकाणी उपस्थित शेतकरी व सातबारा धारक यांनी आपल्या मोबाईलवर पिक पाहणी संदर्भात रजिस्ट्रेशन कसे करावे याचेही मार्गदर्शन केले.यावेळी त्यांच्यासोबत आजगाव मंडल अधिकारी कोदे, तलाठी गोरे उपस्थित होते. तसेच या विशेष ग्रामसभेत मोठ्या संख्येने मळेवाड कोंडुरे ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या वतीने तहसीलदार पाटील यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा