You are currently viewing विषारी द्रव्य प्राशन करून सावंतवाडीत शिक्षकाची आत्महत्या…

विषारी द्रव्य प्राशन करून सावंतवाडीत शिक्षकाची आत्महत्या…

सावंतवाडी

कीटकनाशक पिऊन शिक्षकाने आत्महत्या केल्याचा प्रकार सावंतवाडी शहरात घडला आहे. दशरथ बापू सावंत (५२), असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खासकीलवाडा येथील कॉसमॉस या इमारतीत घडली. कीटकनाशक पिऊन ते आपल्या फ्लॅटमधून इमारतीच्या टेरेसवर गेले होते. त्या ठिकाणी ते अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. सावंत हे शिरशिंगे शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी काही कारणास्तव गेले महिनाभर सुट्टी घेतली होती. आज ते एकटेच घरी होते. त्यांची पत्नी देखील शिक्षिका असून त्या शाळेत गेल्या होत्या. याच दरम्यान त्यांनी हा प्रकार केला. तर ते कीटकनाशक प्राशन केल्यानंतर अतिवस्त स्थितीत बिल्डिंगच्या टेरेसवर अत्यवस्थ आढळून आले. त्यानंतर त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणजोत मालवल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान त्यांच्याकडे सुसाईड नोट आढळली आहे. यात आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, किंवा कोणालाही त्रास देऊ नये, असे म्हटले आहे. तर आजारपणाला कंटाळून त्यांनी हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा आणि मुलगी, असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा