कुडाळ येथे पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ येथे पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आ.वैभव नाईक यांनी भेट देत विद्यार्थ्यांसमवेत केली एक्सर्साइझ

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर युवासेना व पवन स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने मोफत पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीर कुडाळ येथिल क्रिडासंकुल येथे सुरु आहे. हे शिबीर ६ एप्रिल पर्यंत असून दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत घेतले जात आहे. शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. कुडाळ बरोबरच जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत.आमदार वैभव नाईक यांनी रविवारी याठिकाणी भेट देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्वतः विद्यार्थ्यांसमवेत एक्सर्साइझ केली.

शिबिरात प्रसिद्ध अॅथलॅटिक व नामवंत प्रशिक्षक अनिकेत पाटील (मुंबई) व मंथन पेडणेकर हे मार्गदर्शन करत असून यामध्ये अॅथलॅटिक, १६०० मीटर, ८०० मीटर रनिंग, कोन वर्कआउट, कोर वर्कआउट, स्टेप वर्कआऊट, एबीसी वर्कआऊट, विविध फिटनेस आणि स्ट्रेचिंग एक्सर्साइझ, गोळा फेक, लॉन्ग जम्प, पुलअप्स याचा सराव करून घेतला जात आहे. त्याचप्रमाणे लेखी परीक्षेसंदर्भात पुस्तकांची निवड, तसेच प्रश्नपत्रिका स्वरूप याबाबत देखील मार्गदर्शन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा