You are currently viewing मालवणात सलग मनसे पक्ष प्रवेशाचा धडाका….

मालवणात सलग मनसे पक्ष प्रवेशाचा धडाका….

मनसे व मनविसे नविन पदाधिकारी नियुक्त्या जाहिर

मालवण

मालवणात युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश सुरूच असून सलग दुसऱ्या दिवशीही चौके येथील युवकांच्या पक्ष प्रवेशानंतर मालवण तालुका मनसे कार्यकारणीच्या काल दि.१० आॕक्टो.रोजी झालेल्या सभेमध्ये मालवण शहरातील,चौके,वायरीबांध येथील अनेक नवीन युवकांनी राज ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरित होऊन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेत प्रवेश केला.
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दत्तराज चव्हाण, सिद्धेश मयेकर, हर्षल तोरस्कर तन्मय बिळवसकर, राजदीप आरोंदेकर, गौरव कांबळे, अक्षय कांदळकर, रंजन दळवी, राजेश परब या युवकांचा शाल व गुलाब पुष्प देऊन मनसे पक्षात स्वागत केले.
यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी मनसे व मनविसे पदाधिकार्‍यांच्या नव्या नियुक्त्या मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केल्या.

मनसे पदाधिकारी नियुक्त्या

तारकर्ली विभाग अध्यक्ष- बजरंग कुबल
तारकर्ली शाखाध्यक्ष- प्रसाद बापर्डेकर
सर्जेकोट उपविभाग अध्यक्ष- विशाल निकम सर्जेकोट शाखा अध्यक्ष- वैभव आजगावकर
देवबाग शाखाअध्यक्ष -मनोहर केळुसकर
हडी उपविभागअध्यक्ष- अमेय सुर्वे
पोईप उपविभाग अध्यक्ष – हरी खवणेकर

मनविसे पदाधिकारी नियुक्त्या

उपतालुकाध्यक्ष- संकेत वाईरकर.
शहरअध्यक्ष- साईराज चव्हाण.
उपशहरअध्यक्ष -आशिष घाडीगावकर.
सर्जेकोट विभाग अध्यक्ष- गणेश कांदळगावकर. तारकर्ली-देवबाग विभाग अध्यक्ष- प्रतीक कुबल.
कोळंब-सर्जेकोट विभागअध्यक्ष- जनार्दन आजगांवकर.
सर्जेकोट उपविभागअध्यक्ष -दर्शन सावजी
सर्जेकोट शाखाध्यक्ष – वैभव करवडकर
सर्जेकोट शाखाध्यक्ष – वृषभ आजगांवकर

यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव,उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी,मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर,मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,तालुका सचिव विल्सन गिरकर,शहर अध्यक्षा भारती वाघ,उपतालुका अध्यक्षा राधीका गावडे,मनविसे तालुका अध्यक्ष विनायक गावडे,उपतालुका अध्यक्ष उदय गावडे,भुषण गावडे,सचिन गावडे विशाल ओटवणेकर,हरी खवणेकर,संकेतवाईरकर,विशालमाडये, अमित राजापूरकर, नंदकिशोर गावडे, संतोष सावंत, प्रणव उपरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − twenty =