You are currently viewing स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने ग्रामपंचायत खरारे-पेंडूरच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने ग्रामपंचायत खरारे-पेंडूरच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

मालवण :

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन ग्रामपंचायत खरारे-पेंडूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

▪️ ९ ऑगस्ट सकाळी १० ते ११ या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी सैनिक, जेष्ठ नागरिक, माजी सरपंच, गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ माजी सैनिक मार्गदर्शन

▪️ १० ऑगस्ट सकाळी ९ वाजता शासकीय संस्था, देवस्थाने, शाळा, ग्रामपंचायत येथे स्वच्छता मोहीम. दुपारी ३ वाजता महिला मेळावा व महिला बचतगट मार्गदर्शन

▪️ ११ ऑगस्ट शाळा स्तरीय कार्यक्रम

▪️ १२ ऑगस्ट ग्रामस्थ महिला व बचत गट यांना मार्गदर्शन

▪️ १३ ऑगस्ट अंगणवाडी स्तरीय कार्यक्रम तसेच शेतकरी मेळावा व सेंद्रिय शेती कार्यक्रम

▪️ १४ ऑगस्ट वृक्षारोपण कार्यक्रम

▪️ १५ ऑगस्ट सकाळी ७ : ३० प्रभातफेरी, ८ : ३० वाजता ध्वजारोहण व देशभक्तीपर कार्यक्रम

▪️ १६ ऑगस्ट शालेय स्पर्धा, किशोरी मेळावे व सांस्कृतिक कार्यक्रम

▪️ १७ ऑगस्ट सांगता समारोह, स्वराज्य फेरी व चित्रपट सादरीकरण, असे विविध कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती ग्रामपंचायत खरारे पेंडूरचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 11 =