You are currently viewing भाजप पक्षाला गोठणेत शिवसेनेने दिला मोठा धक्का

भाजप पक्षाला गोठणेत शिवसेनेने दिला मोठा धक्का

गोठणे सरपंच श्रेया चव्हाण व माजी ग्रा.प. सदस्य शैलेश चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश

आ. वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन

स्ट्रीटलाईटचे भूमिपूजन तर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण

भाजप पक्षाच्या गोठणे गावच्या सरपंच श्रेया चव्हाण व माजी ग्रामपंचायत सदस्य शैलेश चव्हाण यांनी काल आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. गोठणे कोंडवाडी येथे आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षाच्या शाल घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यामुळे भाजप पक्षाला गोठणे गावात शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे.


याप्रसंगी गोठणे कोंडवाडी येथे आ. वैभव नाईक यांनी आपल्या फंडातून मंजूर केलेल्या स्ट्रीटलाईटचे भूमिपूजन सरपंच श्रेया चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या कामासाठी ५ लाख रु. चा निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्याचबरोबर आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा शिवसेना गोठणे च्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. यातील खुल्या गटात ओसरगाव रुपी इलेव्हन संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर श्री. ब्राम्हणदेव आचरा संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. १५ वर्षाखालील झालेल्या क्रिकेट स्पर्धेत वरवडे संघाने प्रथम पारितोषिक व किर्लोस संघाने द्वितीय पारितोषिक पटकावले. विजेत्या संघांना आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत ३८ संघांनी सहभाग घेतला. सहभागी सर्व संघांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.आमदार वैभव नाईक व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच डेकोरेटर संजय लाड यांनाही सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, किर्लोस सरपंच प्रदीप सावंत, रामगड सरपंच विलास घाडीगावकर, माजी सरपंच दुलाजी परब, गोठणे शाखा प्रमुख सचिन हाटले, सुभाष धुरी,जयराम परब, ग्रा. प. सदस्य अर्चना मुणगेकर, विजय परब, चंद्रकांत लाड, चेतन लाड, महादेव सावंत, भिवा लाड, प्रशांत लाड, किर्लोस शा. प्र. विकास लाड, गणेश घाडीगावकर, सुष्मा लाड, सुगंधा लाड, अनघा लाड, अनुष्का परब, अंजली हाटले, जयश्री परब, राजश्री परब, रेश्मा हाटले, बाळू कुवरे, प्रकाश हाटले, गजानन हाटले, भगवान हाटले, लोचन पालांडे, रामचंद्र जाधव, नरेश लाड आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =