You are currently viewing आद्य कवी केशवसुत स्मारकावरील तुतारीचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक ५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी पार पडणार

आद्य कवी केशवसुत स्मारकावरील तुतारीचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक ५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी पार पडणार

*माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची माहिती*

 

आद्य कवी केशवसुत हे सावंतवाडीत आर पी डी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असताना सावंतवाडीच्या प्रसिद्ध मोती तलावाच्या काठावर बसून त्यांनी संध्याकाळ व तुतारी यासह अशा अनेक कविता लिहिल्या. त्यात त्यांची तुतारी या अत्यंत गाजलेल्या रचनेवरून कविवर्य केशवसुत यांची आठवण म्हणून सावंतवाडीच्या मोती तलावाच्या मध्यभागी कविवर्य केशवसुत कट्टा म्हणून स्मारक उभारण्यात आली होती.

*एक तुतारी द्या मज आणुनि फुंकीन मी ती स्व प्राणानी*

कविवर्य केशवसुत यांच्या याच कवितेची आठवण जपत कट्ट्यावरील चबुतऱ्यावर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात कविवर्य केशवसुतांची तुतारी कवितेची आठवण म्हणून मोठी तुतारी उभारली होती. परंतु गेल्या काही दिवसात त्या तुतारीचा काहीसा भाग तुटल्याने सावंतवाडीतील नागरिकांकडून त्या ठिकाणी भग्न झालेली तुतारी काढून नवीन तुतारी बसविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. सावंतवाडीवसियांच्या भावना लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपण बसविलेली तुतारी काढून त्याठिकाणी आपणच दुसरी तुतारी उभारणार असे जाहीर केले होते. अवघ्या काही दिवसात नवीन तुतारीची उभारणी कविवर्य केशवसुत कट्ट्यावर करण्यात आली आद्य कवी केशवसुत यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या तुतारीचा लोकार्पण सोहळा माननीय माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांच्या हस्ते शनिवार दिनांक ५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ठीक ६.३० वाजता करण्यात येणार आहे. सदर लोकार्पण सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर तसेच त्यांचे सहकारी सुरेश भोगटे, विलास जाधव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 17 =