You are currently viewing जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारात सहभागी होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई..

जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारात सहभागी होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई..

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार जिल्हा बँकेचे उमेदवार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केल्यानंतर या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या अनुषंगाने बँकेच्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक व विकास अधिकारी व विविध विभागाचे सरव्यवस्थापक यांनादेखील जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

29 नोव्हेंबर पासून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकरिता ची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेचे पालन करण्याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. बँकेच्या निवडणुकीकरिता उमेदवारांच्या प्रचारार्थ बँक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होऊ नये असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत. अशी घटना निदर्शनास आल्यास संबंधित बँक अधिकारी कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पहिल्या झालेल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारीची बँक प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, आता यापुढे काय कारवाई होणार याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा