You are currently viewing महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा भाजपचा डाव-आ.वैभव नाईक

महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा भाजपचा डाव-आ.वैभव नाईक

मआ. वैभव नाईक यांच्यासह शिवसेना नेते देवगडात

पुरळ, पडेल, बापर्डे, पोंभूर्ले जि.प.विभागाची बैठक संपन्न

देशात महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. पेट्रोल डिझेल गॅस खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.मात्र या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून वेगवेगळ्या घडामोडी देशात घडविल्या जात आहेत.महागाई बेरोजगारी या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा भाजपचा डाव आहे. भाजपच्या या चुकीच्या धोरणांना वेळोवेळी विरोध करण्याचे काम शिवसेना पक्षाने केले. त्यामुळे हा विरोध मोडून काढण्यासाठी शिवसेनेत फोडाफोडीचे राजकारण भाजपने केले असे असले तरी प्रत्येक शिवसैनिकात बाळासाहेबांचे उद्धवजींचे आणि शिवसेनेचे विचार भिनलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही.असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

देवगड तालुक्यातील पुरळ, पडेल, बापर्डे,पोंभूर्ले या जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक,माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत,जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थिती शनिवारी सायंकाळी सौदाळे येथे संपन्न झाला.यावेळी शिवसेना नेत्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.तसेच देवगड तालुकाप्रमुख पदी जयेश नर यांची नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिवसेनेत जयेश नर यांचे नेतृत्व उदयास येईल असा विश्वास आ.वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी सतीश सावंत म्हणाले,नितेश राणेंच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध असल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युती तोडण्यात आली. जिल्ह्यातील शिवसेना नेते व कणकवली, देवगड,वैभववाडी मतदारसंघातील शिवसैनिकांमुळे मला शिवसेनेचे तिकीट देण्यात आले.शिवसैनिकांनी व जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे शिवसेनेच्या पडत्या काळात शिवसेने सोबत राहून शिवसेना संघटना वाढीसाठी प्रयत्न करणे ही माझी जबाबदारी आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी एकजुटीने कणकवली मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय पडते म्हणाले, देवगड हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेवर कितीही संकटे आली तरी शिवसेना डगमगणार नाही.येत्या निवडणुकीत आपल्याला शिवसेनेची ताकद दाखवून द्यायची आहे. शिवसेनेला त्रास देणाऱ्या लोकांना पराभूत करून त्यांची जागा दाखवून द्यायची आहे.त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी येत्या पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगरपंचायत,ग्रामपंचायत या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी पेटून उठा असे आवाहन त्यांनी केले.

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवकांना शिवसेनेत ,युवासेनेत संधी आहे.नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवून नागरिकांचे प्रश्न सोडवून तरुणांनी आपले नेतृत्व सिद्ध करावे. त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले.
मेळाव्याला देवगड तालुकाप्रमुख जयेश नर व मिलिंद साटम,माजी जि.प.सदस्य प्रदीप नारकर, उपतालुकाप्रमुख सुनील तेली,युवासेना माजी जिल्हाप्रमुख हर्षद गावडे,ग्राहक संरक्षण उपजिल्हाप्रमुख ऍड.प्रसाद करंदीकर, पुरळ विभाग प्रमुख संदीप डोलकर,पोंभुर्ले विभाग प्रमुख दिनेश नारकर, बापर्डे विभाग प्रमुख विष्णू गाडी, पडेल विभाग प्रमुख रमाकांत राणे,देवगड उपनगराध्यक्ष बुवा तारी, माजी उपसभापती संजय देवरुखकर,वाडा सरपंच अनिल जाधव,महीला संघटीका वर्षाताई पवार, युवासेना तालुका अधिकारी निनाद देशपांडे, अमेय जठार,युवासेना विभाग प्रमुख फरीद काझी,पाळेकर वाडी सरपंच काशीराम पाळेकर,शाखाप्रमुख बाळा नरसाळे, पांडुरंग गोठणकर, दीपक तोरस्कर, रवींद्र कोळेकर, गुरुनाथ मेस्त्री, पोंभुर्ले सरपंच सादिक डोंगरकर, आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 14 =