You are currently viewing “इडी” गावात विठ्ठल मंदिर नजीक जुगाराची बैठक

“इडी” गावात विठ्ठल मंदिर नजीक जुगाराची बैठक

*दाभोलीच्या खाकी वर्दीतील बीट अंमलदाराचा आशीर्वाद*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या जुगारांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर काही ठिकाणी छापे पडल्याच्या बातम्या ऐकू येतात. परंतु अशा छापेमारीमध्ये एक दोन जुगारी पकडल्याचे निदर्शनास येत आहे. जुगाराच्या बैठका बसतात त्या ठिकाणी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुगारी एक होतात, त्यामुळे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असताना अनेक लोक आपले नशीब आजमावण्यासाठी येत असतात. अशावेळी पोलिसांच्या छाप्यात एक किंवा दोन जुगारी पकडले जाणे हे हास्यास्पद वाटते.

वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध मंदिर असलेल्या *इडि* गावात विठ्ठल मंदिराच्या नजीक आज सायंकाळी जुगाराची बैठक बसलेली असून इडी गावातील खाकी वर्दीचे शिलेदार, दाभोळेचे रहिवासी असलेले बीट अंमलदार यांच्या आशीर्वादाने सदरची जुगाराची मैफिल सजल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजते आहे. जिल्ह्यातील गावात, कानाकोपऱ्यात जिथे जिथे जुगाराच्या बैठका बसतात त्या ठिकाणी खाकी वर्दीचे हात ओले करूनच मैफिली सजवल्या जात असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याबाबतची योग्य ती दखल घेऊन इडी गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =