You are currently viewing बळीराजा

बळीराजा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री श्रीम.रेखा काळे लिखित अप्रतिम अभंग रचना*

*बळीराजा*

जगाचा पोशिंदा! शेतात कष्टतो!
घामाने भिजतो !दिनरात !!

जमीन कसतो! पेरणी करतो !
वाट ही पाहतो ! पावसाची !!

जीण सार त्याच ! दुःखाचेच असे!
भरवसा नसे! पिकांचा या !!

कधी दूष्काळ ! कधी अतिवृष्टी !
ठेवतो सृष्टी ! विठुराया !!

मालाला त्याच्या ! हमीभाव नाही !
गरीबीत राही ! ‌सदोदित !!

भूक ही भागवी! साऱ्या जगाची !
चिंताही उद्याची ! नसे त्याला !!

झोपडीत त्याच्या !राही आनंदात !
लक्ष्मीची सोबत! असे त्याला !!

कृषीप्रधान तो ! देश आहे माझा !!
भोगे पण सजा! शेतकरी !!

कर्जाचा डोंगर ! सदा त्याच्या डोई !!
जीव नको होई ! पोशिंद्याला !!

येवो बरकत ! त्या बळीराजाला!
मोल ते श्रमाला ! मिळो त्याच्या!!

प्रतिक्रिया व्यक्त करा