You are currently viewing ‘एचएएल’ प्रशासन हादरले….

‘एचएएल’ प्रशासन हादरले….

दिपक शिरसाठच्या ‘उद्योग’ एचएएल प्रशासनला पडला महागात ….

 

नाशिक :

 

पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ ला एचएएलमधील गोपनीय माहिती पुरविणाऱ्या दीपक शिरसाठच्या ‘उद्योगा’ मुळे एचएएल प्रशासन चांगलेच हादरले आहे. दिपक शिरसाठला शुक्रवारी अटक करण्यात आल्यानंतर काल शनिवारी (ता. १०) एचएएल परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना मोबाईल नेण्यास देखील मज्जाव करण्यात आला. याचवेळी, दिवसभर व्यवस्थापनाच्या बैठकांचा धडाका सुरू होत्या.

 

‘हेरगिरीच्या पार्श्‍वभूमीवर कडक बंदोबस्त’

 

बैठका आणि कडक बंदोबस्तामुळे परिसरात मात्र तणावपूर्ण शांतता होती. पाकिस्तानचा खबरीलाल झालेल्या  दिपक शिरसाठच्या हेरगिरीने एचएएल व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांमध्ये खबळबळ उडाली होती. एचएएलमधील कामकाज आज नियमित सुरू होते. पण, नेमकी कोणती माहिती पाकिस्तानला पोचली, याची धाकधुक कर्मचाऱ्यांमध्ये दिसत होती. त्याचवेळी व्यवस्थापनाकडून दिवसभर बैठका सुरू होत्या. त्यानंतर एटीएस पथकाने एचएएल व्यवस्थापनाकडून काही माहिती मागविल्याचे समजते. एरवी प्रतिबंधित क्षेत्रात सर्रास मोबाईलचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज मोबाईल वापरावर निर्बंध घालण्यात आले होते.

 

 

दीपक शिरसाठ प्रकरणानंतर एचएएलमधील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क ठेवण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना मोबाईल वापरास निर्बंधासह आणखी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एटीएस पथकानेही काही माहिती आज मागविली. ती पुरविण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 18 =