आ. वैभव नाईक व कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांचा पाठपुरावा
कुडाळ तालुक्यातील केरवडे कर्याद नारुर येथील रहीवासी विठ्ठल रामा कोळेकर, वय वर्षे ५२, हे दि. ०९ जुलै २०२२ रोजी निळेली येथील ओढ्यामध्ये पाण्यात पडुन मयत झाले आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीम. रुक्मिणी विठ्ठल कोळेकर यांना शासनातर्फे नुकसान भरपाई म्हणून ४ लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आली असून त्यांच्या बँक खात्यात हि रक्कम जमा करण्यात आली आहे.आज त्याबाबतचे पत्र कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते रुक्मिणी कोळेकर यांना देण्यात आले.
केरवडे कर्याद नारुर येथील रहीवासी विठ्ठल कोळेकर यांचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाल्याची बातमी मिळाल्यानंतर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांना धीर देत सांत्वन केले. तसेच शासनाच्या माध्यमातून ४ लाख रु. मदत लवकरात लवकर मिळवून देण्याची ग्वाही आ. वैभव नाईक यांनी दिली होती. आ. वैभव नाईक व तहसीलदार अमोल पाठक यांनी शासनाकडे पाठपुरावा करून कोळेकर कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून दिली आहे.
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,माजी जी. प. सदस्य राजू कवीटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, नगरसेविका श्रेया गवंडे,ओबीसी सेल शहरप्रमुख राजू गवंडे, उपसरपंच तुषार परब, निलेश सावंत, कृष्णा कुबल, अमित राणे, मिलिंद नाईक आदी उपस्थित होते.