You are currently viewing एकनाथ खडसे यांना ED नोटीस का?

एकनाथ खडसे यांना ED नोटीस का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना प्रवर्तन निदेशनालयाने नोटीस  पाठवल्याच्या चर्चा समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी खडसे यांना ईडीने नोटीस पाठवून चौकशीला बोलावल्याचे कळत आहे. मात्र खडसे यांना याबाबत विचारणा केली असता आपल्याला अजूनपर्यंत ईडीकडून कोणतीही नोटीस मिळालेली नसून नोटीस मिळाल्यावर आपण त्याविषयी बोलू अशी भूमिका खडसे यांनी घेतली आहे.

एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवल्याच्या चर्चा समोर येत असल्या तरीही नेमक्या कोणत्या कारणासाठी ईडीला त्यांची चौकशी करायची आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्याकडे खडसे यांच्याविरोधात नक्की काय पुरावे आहेत याबद्दलच्या चर्चांना मात्र यामुळे उधाण आले आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतानाच भाजपावर हल्ला चढवत ईडीचा उल्लेख आवर्जून केला होता. आपण भाजपा सोडण्याला विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच प्रवर्तन निदेशनालयाचाही उल्लेख करत ‘माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन.’ असा इशाराही त्यांनी दिला होता. आता लगेचच त्यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आल्याचे समोर येताच एकनाथ खडसे आता सीडी लावणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =