You are currently viewing संवाद मीडियाचे आवाहन. . .
कोरोनाच्या काळात ज्या भक्तांनी गणेशमूर्ती घरी बनविल्या आहेत त्यांचे फोटो व स्वतःची माहिती संवाद मीडियाला पाठवा....आम्ही प्रसिद्धीस देऊ...

संवाद मीडियाचे आवाहन. . .

कोरोनाच्या काळात ज्या भक्तांनी गणेशमूर्ती घरी बनविल्या आहेत त्यांचे फोटो व स्वतःची माहिती संवाद मीडियाला पाठवा….आम्ही प्रसिद्धीस देऊ…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर केलं होतं, त्यामुळे बऱ्याच लोकांना गणेशमूर्ती शाळेत जाऊन मूर्तीची ऑर्डर देता आली नाही. त्यामुळे काही लोकांनी ज्यांना मूर्ती कला अवगत होती आणि लॉकडाऊनमुळे वेळच वेळ होता अशा हौशी कलाकारांनी स्वतःच्या घरच्या गणेश मूर्ती स्वतःच बनविल्या आहेत.
गणेश मूर्ती बनविणे, रेखणी करणे, आणि त्या मूर्त्यांना साजेसा रंग देणे ही सुद्धा एक उत्तम कला आहे, आणि त्यांना ईश्वराची देणगी सुद्धा लाभलेली असते. आपल्या जिल्ह्यात असे अनेक कलाकार आहेत, जे प्रकाशात येत नाहीत, त्यांची कला झाकली जाते. अशा सर्व कलाकारांना संवाद मीडिया प्रकाशात आणून त्यांच्या मूर्ती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्धीस देणार आहे. जेणेकरून त्या गुणी कलाकारांची कला समाज माध्यमांसमोर येईल, प्रसिद्धी मिळेल.
संवाद मिडियाकडून अशा गुणी कलावंतांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्यांनी स्वतःच्या घरच्या गणेशमूर्ती स्वतःच्या हातानी घडविल्या आहेत त्यांनी मूर्तीचा फोटो व स्वतःची माहिती संवाद मीडियाला पाठवावी. संवाद मीडिया आपल्या वेबसाईटवर अशा कलाकारांना प्रसिद्धी देणार आहे ज्यामुळे भविष्यात उत्तमोत्तम काम करण्यास त्यांना प्रेरणा मिळेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =