You are currently viewing परमार्थ…

परमार्थ…

पाप-पुण्याच्या जमाखर्चाला परमार्थात फार मोठे स्थान आहे तर जीवनविद्येच्या दृष्टीकोनातून पाप-पुण्याचे निश्चित असे स्वरूप कोणते?..

 

पाप व पुण्य हे शब्द ढिसाळपणे वापरत गेल्यामुळे आज ते शब्द जवळ जवळ अर्थहीन झालेले आहेत.पाप-पुण्याचा अर्थ न समजताच बहुसंख्य लोक या शब्दांचा वापर करतात.संकष्टी किंवा एकादशीचा उपास मोडला तर पाप,गुरूचरित्राचे पारायण करताना सोवळे बिघडले तर पाप, देवाला नमस्कार करायला विसरलो तर पाप,अशा पापासंबंधी चुकीच्या कल्पना लोकमानसात मूळ धरून आहेत.तसेच भिकाऱ्याला पैसे देणे, तीर्थात स्नान करणे किंवा अनवाणी उन्हात देवदर्शन घेणे म्हणजे पुण्य, अशा पुण्यासंबंधी चुकीच्या कल्पना आहेत.वास्तविक,वरील सर्व प्रकार हे प्रत्यक्षात ना पाप ना पुण्य,त्या केवळ मनाच्या कल्पना होत.अशा पाप-पुण्याच्या कल्पनांना काहीही महत्त्व नसून निसर्गाच्या नियमांनाच महत्त्व आहे,असा जीवनविद्येचा दृष्टीकोन आहे.’क्रिया तशी प्रतिक्रिया’ हा निसर्गाचा त्रिकालाबाधित नियम आहे.या नियमाप्रमाणे दुष्कर्माची क्रिया घडली की त्याची प्रतिक्रिया दुःख व सत्कर्माची क्रिया घडली की त्याची प्रतिक्रिया सुख ही घडणारच व याला अपवाद सुद्धा नाही.क्रिया व त्याची होणारी प्रतिक्रिया या दोहोंमध्ये अव्यक्त व सूक्ष्म स्वरूपात जे अंतर्मनात वास करून असते,त्याला पाप किंवा पुण्य म्हणतात.तेव्हां दुष्कर्म (Sinful action) म्हणजे पाप नव्हे किंवा सत्कर्म (Good action) म्हणजे पुण्य नव्हे.क्रिया व प्रतिक्रिया या दोहोंच्या दरम्यान आपल्या क्रियेचा जो सूक्ष्म ठसा अव्यक्त स्वरूपात अत्यंत सूक्ष्म रूपाने अंतर्मनात वास करून असतो व अभिव्यक्त होण्यासाठी अनुकूल काळाची व संधीची वाट पहात तेथे ठाण मांडून बसतो,तो सूक्ष्म ठसा म्हणजे पाप किंवा पुण्य होय.*

 

🎯 *Unmanifested inauspicious or auspicious reactions lodged in the sub-conscious mind awaiting for appropriate, favourable circumstances for manifestation in life,can be rightly designated as ‘Papā or Punya’.*

 

*या संबंधीची सविस्तर माहिती आमच्या ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या ग्रंथातील पाप-पुण्याचे खरे स्वरूप या प्रकरणात पहावी.*

 

*🙏सद्गुरू श्री वामनराव पै.🙏*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + seven =