You are currently viewing १३ ऑगस्ट रोजी कणकवलीत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

१३ ऑगस्ट रोजी कणकवलीत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

कणकवली :

 

उच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने कणकवली तालुका विधी सेवा समितीमार्फत कणकवली दिवाणी न्यायालय येथे शनिवार, १३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकादालतीमध्ये दिवाणी आणि फौजदारीकडील प्रलंबित प्रकरणे तसेच वीज वितरण, बीएसएनएल, वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायत करवसुलीसंदर्भातही प्रलंबित प्रकरणांवर निर्णय घेण्यात येणार आहे. या लोकअदालतीमध्ये तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश टी. एच. शेख यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 15 =