You are currently viewing शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे :- अतुल पाटणे आयएएस आयुक्त मुंबई

शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे :- अतुल पाटणे आयएएस आयुक्त मुंबई

अमरावती

विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तोंड ओळख करून दिली आणि त्यांना महाराष्ट्र शासनाच्या प्रज्ञाशोध परीक्षा सारख्या विविध परीक्षांना बसविले तर अशी मुले पुढे चालून चांगल्या प्रकारे स्पर्धा परीक्षांच्या सामोरे जाऊ शकतात व त्यामध्ये उत्तीर्ण होऊ शकतात. त्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीचा मिशन आयएएस हा शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी हा उपक्रम अतिशय चांगला असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्राचे मत्स्यपालन विभागाचे आयुक्त तसेच सुप्रसिद्ध कवी डॉ.अतुल पाटणे यांनी आज अमरावती येथील विश्रामभवनामध्ये काढले. आज त्यांचे अमरावती येथे आगमन झाले असताना डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीचे प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी त्यांचे मी आयएएस अधिकारी होणारच शेतकऱ्यांची मुले झालीत कलेक्टर तसेच आयएएस अधिकाऱ्यांच्या यशोगाथा व स्पर्धा परीक्षेची एबीसीडी ही पुस्तके देऊन त्यांच्या सत्कार केला .त्या प्रसंगी ते बोलत होते .यावेळी अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविश्यांत पंडा आयएएस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .यावेळी मत्स्यपालन विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री विजय शिखरे सहाय्यक उपायुक्त श्री सुनील जांभुळे तसेच सामाजिक कार्यकर्ते व किसान एकता म्हणजे मंचेचे श्री राजीव तायडे व मच्छीमार संघटनेचे नेते श्री राजेंद्र पारिसे व पदाधिकारी श्री संजय सुरजुसे आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी डाँ. अतुल पाटणे व श्री अविश्यांत पंडा यांच्या हस्ते मत्स्य पालन विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ.अतुल पाटणे यांनी अमरावती येथील शालेय विद्यार्थ्यासमोर बोलण्याची व त्यांना मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली असून याच महिन्यात ते त्यासाठी वेळ उपलब्ध करून देणार आहेत .डाँ.अतुल पाटणे हे यापूर्वी देखील मिशनच्या उपक्रमामध्ये सहभागी झाले असून एक चांगले कवी व गायक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे . प्रकाशनार्थ प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =