You are currently viewing खासदार विनायक राऊत व पालकमंत्री ना.उदय सामंत यांचे वेंगुर्ला तालुका काँग्रेसने मानले जाहीर आभार…

खासदार विनायक राऊत व पालकमंत्री ना.उदय सामंत यांचे वेंगुर्ला तालुका काँग्रेसने मानले जाहीर आभार…

वेगुर्ला

एम. एच. टी. सी. ई. टी. 2020 या परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 177 विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथे परीक्षा केंद्राचे वाटप पी.सी.एम. या गटाच्या परीक्षेकरिता करण्यात आलेले होते. त्यात वेंगुर्ले तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष विलास गावडे यांनी खासदार व पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सध्याच्या कोरोना महामारी च्या काळात प्रचंड मानसिक, शारीरिक व आर्थिक मनस्ताप सोसावा लागणार आहे. याची कल्पना देऊन सदर परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परीक्षा केंद्र तात्काळ मंजूर करावी अशी विनंती केली होती. खासदार व पालकमंत्री यांनी यावर त्वरित कार्यवाही केल्याने आजपासून होणाऱ्या एम. एच. टी. सी. ई. टी. 2020 साठीची परीक्षा केंद्र बदलून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देण्यात आलेली आहेत.
विद्यार्थ्यांना देण्यात आलेले जुने हॉल तिकीट हे रद्दबादल करण्यात आलेले आहे. नवीन हॉल तिकीट विद्यार्थ्यांनी mhtcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करून प्राप्त करून घ्यावे तर बदलण्यात आलेल्या परीक्षा केंद्राबाबत ची माहिती एस एम एस आणि ई मेल द्वारे संबंधित विद्यार्थ्याला महा ऑनलाईन संस्थेमार्फत पाठविण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांना काही माहिती अथवा तक्रार असल्यास maharashtra.cetcell.gmail.com ह्या ई-मेल वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.
त्यामुळे वेंगुर्ला तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचा हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांचे वेंगुर्ले तालुक्यातील विद्यार्थी व पालकांच्या वतीने वेंगुर्ला तालुका काँग्रेसने आभार मानले आहेत. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात विलास गावडे व विद्यार्थ्यांचे पाच पालक प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानणार आहोत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =