You are currently viewing माणगांव येथे अपघातात सौंदाळे येथील आंबा व्यावसायिकाचा जागीच मृत्यू

माणगांव येथे अपघातात सौंदाळे येथील आंबा व्यावसायिकाचा जागीच मृत्यू

देवगड

माणगांव पेट्रोलपंपजवळ मॅक्सपिक अप गाडीच्या झालेल्या अपघातात देवगड तालुक्यातील सौंदाळे येथील मनीष कृष्णाजी गोखले(५०) यांचा जागीच मृत्यु झाला आहे.हा अपघात शनिवारी सकाळी १०.३० वा.सुमारास झाल्याचे समजते.

सौंदाळे येथील आंबा व्यावसायिक मनीष गोखले हे त्यांचा मालकीची मॅक्स पीक अप गाडीने आंबे घेवून शुक्रवारी वाशी मार्केट येथे गेले होते.आंबे मार्केटमध्ये देवून ते देवगडला परत येत असताना माणगांव पेट्रोलपंपजवळ मॅक्सपिक अप गाडीला अपघात झाला.या अपघातात त्यांचा जागीच मृत्यु
झाला.त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा