You are currently viewing रोटरी क्लब आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तळेरे महाविद्यालयाचे यश

रोटरी क्लब आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तळेरे महाविद्यालयाचे यश

वामनराव महाडीक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धेत उज्वल यश

मिताली चव्हाण प्रथम तर द्वितीय स्नेहल तळेकर

रोटरी क्लब, कणकवली आयोजित कै. विष्णू शंकर पडते स्मृती वक्तृत्व स्पर्धा २०२२ नुकतीच कणकवली येथे पार पडली यामध्ये ११ ते पदवी या महाविद्यालयीन गटातून वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळेरेमधील विद्यार्थ्यांनीं उज्वल यश संपादन केले .
महाविद्यालयीन गटातून मिताली गोपाळ चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकावला तर स्नेहल संतोष तळेकर हिने द्वितीय क्रमांक तर उत्तेजनार्थ विराज संजय नांदलस्कर याने मिळवत महाविद्यालयीन गटामध्ये तळेरे महाविद्यालयाचे वर्चस्व प्रस्थापित केले. प्राध्यापिका एस . एन्. जाधव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते , यावेळी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका पी. एम. पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले.
रोटरी क्लबच्या बक्षीस वितरण समारंभात या सर्व विद्यार्थ्यांना कणकवली रोटरी क्लबचे रोट्रीयन वर्षा बांदेकर , दिपक बेलवलकर , रविंद्र मुसळे , मेघा गांगण , उषा परब , आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर , शाळा समिती चेअरमन अरविंद महाडीक , प्रविण वरूणकर, शरद वायंगणकर , दिलीप तळेकर , संतोष जठार , संतोष तळेकर , निलेश सोरप , उमेश कदम , प्राचार्य अविनाश मांजरेकर , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी पालक, ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

महाविद्यालयीन गटातून मान्यवराच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्विकारताना मिताली चव्हाण

प्रतिक्रिया व्यक्त करा