भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख
साप म्हटलं की आपल्या अंगावर काटा येतो. एकप्रकारची भिती आपल्या मनात घर करून बसते यासाठी आपलं अज्ञान कारणीभूत असतें . आपण आपल्या परिसरात आपल्या जवळच्या शेतात पाऊस पडून गेला किंवा हिवाळ्यात थंडी असते अशावेळी उन्हात मोकळं पडलेली जनावरं आपण बघतो. पूर्वी मातीची घर होती घरांत धान्य पुष्कळ असायचं आणि धान्यामुळे घरांत उंदीर असायचं . सापांचे मुख्य खाद्य उंदीर बेडूक. हेच असतं त्यामुळे जुन्या घरांत वारंवार पूर्वी साप निघत असत. पूर्वी दवाखाने नव्हते कमी होते त्यावेळी साप चावून होणारे मृत्यू प्रमाण जास्त होत. जंगली औषध. देवदेवतांची अंधश्रद्धा. अशा घटना त्यावेळी होत होत्या यामुळे लोकांचे मृत्यू प्रमाण जास्त होते .
नागपंचमी आली की आपणं मातीच्या सापांचे अतिशय श्रद्धेने पूजा करतो आपली मनोकामना मागतो. आपल्या आई बहीण नागपंचमी आगोदर आपल्या भावाच्या रुपात सापाचा उपवास करतात आणि नागपंचमी दिवशी लाह्या दुध वारुळाला वाहतात आणि नागपंचमी साजरी करतात हि धर्माची आणि श्रद्धेची बाब आहे.
श्रध्दा. आणि धर्माची बाब थोडी बाजूला ठेवा आणि आपण काय करतो याचा विचार करुया ज्या सापाला आपणं जीवंत असताना शोधून आणि पळवून मारतो . आणि नागपंचमी असली की आपणं मातीच्या सापांचे पूजन करतो . त्याला लाह्या दूध देतो अशी मानसिकता आपली का असते समजतं नाही. एवढंच काय संकष्टी असली की आपणं मातीच्या दगडाच्या उंदराच्या कानात आपली मनोकामना सांगतो आणि तोच उंदीर जीवंत असल्यास आपण त्याला ठार मारतो जाळ्यात धरतो आणि पाण्यात बुडवून मारतो ही कसली भक्ती आणि ही कसली श्रध्दा हा तर आपला स्वार्थ आहे. शासन वन्यजीव संरक्षण करण्यासाठी विविध कायदे नियम अटी शर्ती घातल्या आहेत तरी सुध्दा आज वन्यजीवांचा मानवाने छळ मांडला आहे .
साप हा सरपटणारा प्राणी आहे. सापांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. त्यांना हातपाय नसल्याने ते जमिनीवर नागमोडी आकारात सरपटतात. सापांबद्दल जनमानसात भीतीची भावना असते, त्याचे कारण म्हणजे त्यांचे विष. साप चावल्यानंतर त्याचे विष भक्ष्यामध्ये सोडतो. विषाच्या प्रभावाने भक्ष्य काही वेळात मरते व त्यानंतर साप ते भक्ष्य खातो. हजारो माणसे दरवर्षी सर्पदंशाने मरतात. खरेतर सर्वच साप विषारी नसतात केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. सापांची विषारी व बिनविषारी अशी वर्गवारी होऊ शकते. सापांच्या डोक्याच्या कवटीमध्ये सांध्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते त्यांच्या जबड्यापेक्षा जास्त मोठे भक्ष्यदेखील गिळू शकतात, यामुळे अनेक सापांना दरवर्षी मारले जाते .
सापांशी निगडित अनेक गैरसमज आहेत. साप माणसांना खातो, साप बदला घेतात, काही साप मेंददू खातात. पण ह्यांत काहीही तथ्य नाही. भारतात प्रामुख्याने मानवी वस्तीत आढळणारे चार प्रमुख विषारी साप आहेत नाग, मण्यार, घोणस व फुरसे. घोणस सापाच्या दंशामुळे भारतात सर्वाधिक लोक मरतात. सर्पदंशावर निव्वळ एकमात्र उपाय म्हणजे सापाचे प्रतिविष. ह्या व्यतिरिक्त सर्प दंशावर दुसरा कोणताही उपाय नाही.
असतो सापाला केस असतात साप धनाचे रक्षण करतो साप पाठलाग करतो साप पुंगीवर नाचतो साप बदला घेतो साप दूध पितो विशिष्ठ सापामुळे धन लाभ होतो. पावसाळ्यात शेतात काम करणाऱ्या गरीब, शेतकरी, कष्टकरी लोकांना जास्त प्रमाणात साप चावतात. त्यामुळे सापाविषयी आणि त्यावर उपचाराची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवणे फार गरजेचे आहे. सगळेच साप विषारी नसतात, साप दिसला की यमराजच आठवतात. कारण साप चावला की काही क्षणात माणूस दगावतो अगदी हेच आपल्या मनावर बिंबवले आहे. पण ते नक्कीच सत्य नाही. सगळेच साप विषारी नसतात, विषारी साप चावला तर माणूस दगावत नाही. साप या निष्पाप जीवाविषयी गैरसमज आणि त्यांचा भडीमार या प्राण्यांचा तिरस्काराला कारणीभूत आहे. गेल्या तीन वर्षांत 700 ते 80 तसेच 11 फुटाची धामिण, सहा फुटाचा किंग कोब्रा सुद्धा पकडला आहे. दरवर्षी सर्पदंश झालेल्या चार ते पाच नागरिकांचे प्राण वाचवतो. – अली मुजावर, सर्पमित्र, मंद्रूप सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी सोलापूर जिल्ह्यात सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत एक ते दोन टक्के इतके आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणवर साप बाहेर पडत असतात. सर्पदंश झाल्यावर लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावेत
दूध हे सापाचे अन्न नाही. यामुळे त्याला नागपंचमीला लगेच दूध पाजण्यास जाऊ नका. साप हा शाकाहारी नाही, त्याला श्रावण वैगरे काही नसतो, साप शुद्ध मांसाहारी आहे. त्यामुळेच तो आपल्या घरी उंदीर, पाल, कीटक खाण्यासाठी येतो. सापाला लांबचे दिसत नाही, जवळचे दिसते. तरी ब्लॅक अँड व्हाइटमध्ये दिसते. फोटोच्या निगेटिव्हसारखे. साप घरात येऊ नये असे वाटत असेल तर उंदीर, पाल, कीटकांचा बंदोबस्त करा. घराच्या बागेतील डबके, भिंतीच्या चिरा, दरवाजा फटी बुजवा.आणि सापांचे आपल्या परिसरातील राहणे बंद करा
सर्पदंश टाळा आणि सापांविषयी माहिती जाणून घ्या. सापांची विषारी आणि बिनविषारी वर्गवारी होऊ शकते. बिनविषारी साप जास्त संख्येने आहेत ते चावले तरी माणूस मरत नाही. साधे टीटीचे इंजेक्शन घेतले तरी पुरेसे (अजगर, धामण, तस्कर, गवत्या, वाळा, दिवड, कवड्या, नानेटी, मांडोळ -बिन विषारी) विषारी साप चावल्यास योग्य उपचार न मिळाल्यास माणूस मरतो. प्रामुख्याने आपल्या भागात चार विषारी साप सापडतात. त्यामुळे त्यांची माहिती जाणून घ्या, त्यांच्यापासून दूर रहा. विषारी साप कसे ओळखणार? – नाग (नागराज) : जो फना काढून उभा राहतो तो नाग, जोरात फुत्कार, फुस्स असा सारखा आवाज आल्यास जवळ नाग आहे असे समजावे. – मण्यार : काळपट नीळसर रंग, अंगावर पांढरे पट्टे, शेपटीकडे अधिक डोक्याकडे कमी होत जातात हा साप इतर सापांना खातात. – फुरसे : फूटपट्टी एवढी लांबी, शरीरावर वेलबट्टी सारखे नक्षीकाम, डोक्यावर बाणासारखी खूण, दंश करताना जिलेबीसारखा आकार करून शरीर एकमेकावर घासतो आणि करवतीसारखा करकर आवाज करतो. – घोणस : हा साप कुकरच्या शिट्टीचा आवाज काढतो, अंगावर साखळीसारखे काळ्या रंगाचे टिपके असणाऱ्या रेषा असतात, डोक्यावर इंग्रजी व्ही अक्षर असते. इतर विषारी सर्प-समुद्री साप, चापडा वरील विषारी साप चावल्यास त्वरित सरकारी मोठ्या दवाखान्यात घेऊन जा, नेत असताना प्रथमोपचार करा. दंशावरच्या बाजूस आवळपट्टी बांधा, हृदयाच्या दिशेने, आवळपट्टीमध्ये एक बोट जाईल एवढी घट्ट बांधा, ती अधूनमधून सैल करून पुन्हा बांधा, डोक्याला साप चावल्यावर गळ्याला आवळपट्टी बांधू नका. माहीत नसल्यास जखमेवर चिरा देऊ नका. सिनेमात दाखवतात त्या पद्धतीने तोंडाने विष शोषण करू नका नाहीतर जीव गमवावा लागेल.
जगभरात सापांच्या सुमारे अडीच हजार जाती आहेत. त्यात भारतात 340 जाती आढळतात. त्यांपैकी फक्त 69 जाती या विषारी आहेत. महाराष्ट्रात सापांच्या सुमारे 52 जाती असून त्यापैकी 12 जाती विषारी आहेत. यापैकी साधारण 27 जातींचे साप सापडतात, त्यात पाच जातीचे विषारी आहेत. साप प्रामुख्याने उबदार हवामानात आणि गवताळ व सुपीक प्रदेशात आढळतात. साप जमिनीवर तसेच पाण्यातही आढळतात. जातीचे चार प्रमुख साप आढळतात. परंतु, पाचवा साप हा पोळा दुर्मिळ आहे. बाकी चार सर्वत्र आढळतात. नाग, मण्यार, घोणस, फुरसे तसेच अजगर, तस्कर, कवड्या, पानदिवड, धामण, गवत्या, धुळ नागीन, डुरक्या घोणस, मांडोळ, कुकरी, पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या, बिन विषारी जातीचे साप आढळतात. तसेच, निमविषारी (अर्धी विषारी) साप म्हणजे मांजरय्या, हरणटोळ ही आढळतात. सोलापूर शहरामधून अनेक राष्ट्रीय महामार्ग गेल्याने काही परराज्यातील साप आढळून आले होते. उडता सोनसर्प, चापडा, मालबर चापडा, हरणटोळ हे साप अढळतात.
आपणं सापा बदल आपल्या मनात शंकाकुशंका जास्त आहेत सापाच्या विषाने कमी आणि साप चावल्याचया भीतीने माणूस लवकर मरतो सापाच्या बाबतीत जनप्रबोधन होण गरजेच आहे सापाच्या विषाची तस्करी करणारे नाहक सापाचा जीव घेत आहेत वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार या़चयावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे .
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९