You are currently viewing उंच दहीहंड्याचा थरार कशाकरता

उंच दहीहंड्याचा थरार कशाकरता

*दैनिक ठाणे वैभवचे पत्रकार स्तंभलेखक कवी ॲड.रुपेश पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*उंच दहीहंड्याचा थरार कशाकरता?*

 

मित्रांनो गोकुळाष्टमीला आपण रात्री बारा वाजता बाळ कृष्णाचा पाळणा हलवतो आणि कृष्ण जन्मोत्सव साजरा करतो. कृष्ण हे दैवत प्रेमाचे, मैत्रीचे, भक्तीचे, बंधूभावाचे तसेच लोकसंग्रहाचे प्रतीक आहे. म्हणून आपण सर्वजण कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी काला करतो. जल्लोषात दहीहंडी साजरी करतो.

 

बालकृष्ण गोकुळात जेव्हा लहानाचा मोठा होत होता. तेव्हा तो आपल्या यशोदा माईकडून दही, लोणी हट्टाने खात असे. आपल्यासारखे दही, लोणी इतर मुलांना खाता यावे. याकरता तो गोकुळातील गोपिकांनी, आयाबायांनी जमवून ठेवलेल्या दह्याच्या हंड्या बाळ गोपाळांना जमून फोडत असे. त्या सर्वांना दही, लोणी खायला घालत असे. त्यातून त्याला आनंद मिळत होता. जगातील सर्वात मोठा आनंद सामुदायिक भोजनात आहे. म्हणून तो बालकृष्ण आपल्या सवंगड्यांबरोबर दही, लोण्याचा गोड आनंद लुटत असे.

 

या सर्व दहीहंड्या घरात वरती बांधलेल्या असायच्या. त्या दहीहंड्या बघून कृष्ण दुपारच्या वेळी कुणी नसताना. आपल्या मित्रांन सोबत त्या हंड्या फोडायचा किंवा खाली काढायचा. मग दही, लोणी खाऊन ते सर्वजण आनंदात नाचायचे. अशा प्रकारच्या कृष्णाच्या लीला त्या गोकुळात चालायच्या. कृष्ण सर्वांना आनंद द्यायचा, लोकांचे दुःख दूर करून त्यांना आपलेसे करायचा. म्हणून त्याने दहीहंडी हा छोटासा खेळ शोधून काढला असावा.

 

आज या दहीहंडीला व्यापक स्वरूप दिले जात आहे. ही सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. याकरता पूर्वजांनी हिंदू सण उत्सवाची परंपरा निर्माण केली.

परंतु ती परंपरा छोट्या खेळाची होती. एक, दोन थर लागायचे आणि तिसर्या थरावर कृष्ण दही काढायचा. आजचा आपला कृष्ण दहाव्या, अकराव्या थरा वर चढतो. मग दहीहंडी फोडताना कधीकधी त्याचा पाय सरकतो. तोल गेल्यामुळे तो बिचारा खाली जोराने येतो. खालचा तरुणांचा घोळका त्याला झेलण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतात. कारण तो वरचा तरुण एकावेळी दहा-बारा जणांना खाली घेऊन येतो.

 

त्यामुळे प्रचंड मोठे अपघात घडतात आणि हां हां म्हणता वरचा गोविंदा आपटून जायबंदी होतो. हातापायातील हाडांचा चुरा होतो, पाठीच्या मणक्याला इजा होते, हेल्मेट न लावल्याने डोक्याला जबरदस्त मार लागतो. असे दहीहंडी खेळणाऱ्या सर्व तरुणांचे होत असते. काही तरुण चेंगरल्यामुळे जायबंदी होतात, अपंग होतात. दवाखान्यात दाखल होतात. त्याचा खर्च दहा दहा लाखाच्या वर जातो. असा खर्च केला तरी तरुणांचे पूर्वीसारखे अवयव होत नाहीत. त्यांना घरात बेडवर काही महिने, वर्षे, तर कधी कधी कायमस्वरूपी पडून राहावे लागते. त्यामुळे हे जीव घेणे खेळ कशासाठी? असा प्रश्न आपल्यालाही पडावा. त्यातून जनजागृती व्हावी. यातून थरांचा हा थरार कमी व्हावा. चार थरांची हंडी असावी. त्यासाठी नेट गादीचा उपयोग केला जावा. जेणेकरून तरुणांच्या जीवनात कायमस्वरूपी अपंगत्व येऊ नये. इतकेच मला वाटते.

 

ॲड.रुपेश पवार, ठाणे

99 30 85 21 65

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − four =