You are currently viewing माडखोल-धवडकी येथे वाळू वाहतूक करणारा ट्रक घरावर कलंडला…

माडखोल-धवडकी येथे वाळू वाहतूक करणारा ट्रक घरावर कलंडला…

घराच्या छप्पराचे व गाडीचे नुकसान…

सावंतवाडी

चालकाचा ताबा सुटल्यामुळे वाळू वाहतूक करणारा ट्रक थेट घरावर कलंडून अपघात झाला. ही घटना काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास माडखोल-धवडकी येथे घडली. सुदैवाने या अपघातात चालकाला आणि संबंधित घरातील व्यक्तींना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्या घराच्या छपराचे आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तर अपघातानंतर मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील व्यक्तींनी त्या ठिकाणी धाव घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित ट्रक वाळू घेऊन आंबोलीच्या दिशेने जात होता. यावेळी तो माडखोल-धवडकी येथे आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि “तो” थेट घरावर जाऊन कलंडला. यात घराच्या छप्पराचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने घरातील व्यक्ती बाल-बाल बचावल्या. मध्यरात्री हा प्रकार घडल्यामुळे त्यांची भीतीने गाळण उडाली. दरम्यान मोठा आवाज झाल्याने परिसरातील व्यक्तींनी त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी अपघात घडल्याचे उघड झाले. दरम्यान आतील चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ट्रक मालकाला अपघाताची कल्पना देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा