You are currently viewing आरपीडी कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आरपीडी कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी दिशादर्शक; प्रा. एस. जी. धोनुकुसे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांकडे उत्तम टॅलेंट असूनही प्रशासकीय सेवेतील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टक्का अजूनही कमीच आहे. याचे कारण म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांना मिळत नसलेले स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन. त्यामुळे राणी पार्वतीदेवी कनिष्ठ महाविद्यालयने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भविष्यातील सिंधुदुर्गासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन ओरोस येथील गुरुकुल करिअर अकॅडमीचे प्रा. एस. जी. ढोणुकसे यांनी केले.
सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये प्रा. एस. जी. ढोणुकसे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य धोंड, उपप्राचार्य सुमेधा नाईक, प्रा. परब, प्रा. सौ रमा घोरपडे, प्रा. माने, प्रा. कांबळे, प्रा. म्हसकर, प्रा. पाथरवट, अकॅडमी क्रीडा कोचचे नामदेव जंगले, सिद्धांत डांगी, सुरेश लांबोरे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. एस. जी. ढोणुकसे यांनी स्पर्धा परीक्षेचे व प्रशासकीय सेवेचे महत्त्व अधोरेखित करीत प्रशासकीय सेवा हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे नमूद केले. तसेच करिअर, चांगली नोकरी, मानसन्मान, प्रतिष्ठा मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षा एक उत्तम मार्ग असल्याचे सांगितले. तसेच पोलीस, सैन्य, एमपीएससी, सरळ सेवा आदी विविध परीक्षेतील संधी, अभ्यास पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा