You are currently viewing सातार्डा हायस्कुलच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन..

सातार्डा हायस्कुलच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन..

सावंतवाडी
सातार्डे मध्यवर्ती संघ मुंबई संचलित, महात्मा गांधी विद्या मंदिर हायस्कूल सातार्डा या प्रशालेच्या “हिरक महोत्सवी” वर्षाचे औचित्य साधून संजय पिळणकर व मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून,माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१४ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० ते १.०० या वेळेत सातार्डा हायस्कूल येथे महा रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
या रक्तदान शिबिराला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी, शिक्षणप्रेमींनी, पालक,पंचक्रोशीतील ग्रामस्थ व मित्र परिवाराने या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे भाग घेऊन हे महारक्तदानाचे शिबीर यशस्वी करून शाळेचे हिरक महोत्सवी वर्ष साजरे करावे व या कार्यक्रमाची शान वाढवावी असे,आवाहन संजय पिळणकर व मित्रमंडळ यांनी केले आहे.

इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी डी.एन.मांजरेकर, सातार्डा ९४२१२६५७५१,पप्पी कवठणकर,कवठणी ९५४५८३७१८२/८३२९४३७५६९, उमेश कांबळी,साटेली ७७९८९२८११४,रुपेश साळगावकर,सातोसे ९८२३८४१२८४,बाबली गवंडे ८३९०९०५२६९ यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा