You are currently viewing पाऊस

पाऊस

*लेखक कवी प्रा. दिलीप सुतार कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर यांनी लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*

*पाऊस*

पाऊस कधी वेडापिसा
कधी शहाणा…
पाऊस केवळ एक बहाणा
मनमोकळे करण्याचा…!
पाऊस कधी अवखळ
कधी शांत…शांत
तुझ्या मैत्रीची…तुझ्या प्रीतीची
मौज लुटणारा…
कधी तुझ्यात गुंतण्याची
अटळ सजा देणारा…!!
पाऊस कधी वेडावणारा…
कधी रिमझिमणारा
कधी तुझ्याच सुगंधी स्मृतीनी
मनाला अखंड हुरहुर लावणारा…!!!
कधी तुझ्याच अश्रूतून
संततधार विरही निखारे बरसणारा…
पाऊस कधी घनात
कधी मनात…कधी कधी
तुझ्या फुलपंखी पापण्यांत
विनाकारण दाटून येणारा…!!!
तर कधी…
तुझ्या अव्यक्त प्रीतीचा दरवळ
मृण्मयी मातीला देऊन…
दशदिशा गंधाळत जाणारा…!!!!
—————————————
प्रा.दिलीप सुतार
कुरूंदवाड
मो.नं.9552916501

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 3 =