You are currently viewing विज कंत्राटी कामगार संघटनेच्या सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर…

विज कंत्राटी कामगार संघटनेच्या सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर…

कंत्राटी कामगारांनी एकसंघ राहून एकजूट जोपासावी; जिल्हाध्यक्ष अशोक सावंत

कुडाळ

वीज कंत्राटी कामगार संघटनेची मासिक बैठक कुडाळ येथील एम आय डी सी रेस्ट हाऊस मध्ये जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली असून, या बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा सरचिटणीसपदी संदीप बांदेकर, जिल्हा उपाध्यक्ष सर्वेश राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश पवार, कोषाध्यक्ष मोहन गावडे, जिल्हा संघटकपदी आनंद लाड यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अशोक सावंत म्हणाले की, कंत्राटी कर्मचाऱ्यानी अशाच प्रकारे एकसंघ राहून आपली एकजूट जोपासावी. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांचे हिताचे निर्णय घेण्यात आले. यावेळी कंत्राटी कामगारांच्या संदर्भात महावितरण मध्ये सुरू असलेल्या कोर्ट केस सुरू आहेत. तसेच नवीन कोर्ट केस उपस्थित झाल्या आहेत. त्याबाबत सविस्तर चर्चा करून योग्य असा निर्णय घेण्यात आला. तो लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल अशी माहिती श्री सावंत यांनी दिली. यावेळी शाश्वत रोजगार आणि पगारवाढ यावर बैठकीत चर्चा झाली असून, पुढील रणनीती आखण्यात आली आहे. यावेळी शासनाकडून केवळ आश्वासन नको तर कृती हवी यासाठी सिंधुदुर्ग विज कंत्राटी कामगार संघटना बाधील असून, येणार काळ हा नक्कीच विज कामगारांच्या भविष्याचा काळ असेल असा विश्वास अशोक सावंत यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटना सिंधुदुर्गचे तालुका प्रतिनिधी योगराज यादव, दोडामार्ग प्रतिनिधी दर्शन देसाई, ओरस प्रतिनिधी विनोद बोभाटे, चेतन सावंत, रघुनाथ जाधव, सल्लागार जयेंद्र कुंभार, गणेश राऊळ संदेश गावडे, अजित पालकर, दीपक परब, गुणाजी आईर, सचिन नाईक, सदानंद पवार, रितेश जाधव, दिनेश करीलगेकर, विशाल सुकळवाडकर, रवींद्र परब, दीपक वायंगणकर, दीपक निवळे, रुपेश जाधव, गणेश परब अंकुश चव्हाण, हरेश लांबोरे, गणेश गावकर, संदेश वरावडेकर, विनय येरम, वैभव ठाकूर, महादेव नाईक, देऊ जाधव, दिनेश राऊळ, सायली सांगोलेकर, योगेश म्हसकर, श्रीराम कुंभार, प्रसाद मेस्त्री, कृष्णा पवार , स्वप्निल तावडे, दाजी कुंभार, विनायक गावडे, योगेश धरणे, अजित पाटयेकर आदी मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =