पत्रा देवी सीमेवरील दोन्ही गेट खुले

पत्रा देवी सीमेवरील दोन्ही गेट खुले

पत्रा देवी सीमेवरील दोन्ही गेट खुले

बांदा / प्रतिनिधी :-

गोवा राज्य सरकारने गोव्यात येण्यासाठी विनाअट मार्ग मंगळवारपासून मोकळा केला. सिंधुदुर्गमध्ये येण्यासाठी तपासणी आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. त्यामुळे गोव्यात रोजगारासाठी दररोज ये-जा करणार्‍यांचा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र मंगळवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी रोजगारासाठी ये-ज करणार्‍यांसाठी सूट दिल्याने येथील युवकांचा रोजगाराचा प्रश्‍न सुटला आहे.

बुधवारी दिवसभरात गोव्यात अनेक युवकांनी आपल्या कंपनीमध्ये जाऊन पुन्हा सिंधुदुर्गमध्ये परतले आहेत. मात्र, गोव्यातून येणाऱ्या इतर प्रवाशांची कडक तपासणी नाक्यावर करण्यात आली. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन दरम्यान गोव्यात रोजगारासाठी जाणाऱ्या अनेकांनी आपले घर गाठले होते. लॉकडाऊन संपणार व आपण गोव्याला जाणार या आशेवर येथील युवक गेले पाच महिने घराकडे बसून होते. दरम्यान, अलीकडे गोव्यात येणाऱ्यांसाठी सगळे मार्ग खुले केल्यानंतर येथील युवकांना दररोज ये-जा करण्यासाठी सुट मिळेल की नाही हा मोठा प्रश्न होता.

मात्र, मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीर्‍यांनी याबाबत तोडगा काढून गोव्यात रोजगारासाठी जाणाऱ्यांना परत येण्यासाठी सूट दिली आहे. त्यामुळे या भागातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न सुटला आहे. बुधवारी दिवसभरात अनेक युवक गोव्यात जाऊन आपल्या घरी परतले. तर गोव्यातून येणाऱ्या इतर गाड्या प्रवाशांची तपासणी येथील तपासणी नाक्यावर करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा