You are currently viewing कॅनव्हास!माझ्या जगण्याचा!

कॅनव्हास!माझ्या जगण्याचा!

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना

माझाही कॅनव्हास होता कधीतरी कोरा
त्यावर रेघही उमटली नव्हती
अनुभूतीतून मी रंगवायला गेलो!नाहीतर
त्यावर रंगाची उधळण झाली नसती

अन्वयार्थ चौकटीचा शोधता शोधता
हळूहळू जिवनरंग उमटू लागला
गोंधळलं मन अन् !उतू गेला भार
दुबळ्या ब्रशचा अंतरी तोल गेला….!

होता रिक्त मन!भरत गेलो रंग
रंग ओघळले!रंगाचे फिक्कट पाणी
दबल्या भुतांना मोकाट सोडलं
कॅनव्हास आटला! दडली मुकी वाणी.!

कॅनव्हास रंगवत !साचवत आठवणी
सर्जकता गुंतागुंत मी स्विकारत गेलो
खरडलं खूप! आफत ही जीवघेणी
संवेदनेतून मी सत्य भासवत गेलो..!

कधीतर माझचं रंगविलेलं चित्र
मलाच ओळखता येत नाही
ओळखीचा कॅनव्हास होतो परका
तोही मला ओळख देत नाही…!!

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =