You are currently viewing इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सावंतवाडी

इनरव्हील क्लबच्यावतीने दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येत असून यावर्षी डिस्ट्रिक्ट कडून आलेल्या गोल प्रमाणे महिलांसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे आरोग्य व कॅन्सर व्हॅक्सिनबाबत अवेअरनेस कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शाळांना सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल आणि वेंडिंग मशीन देण्यासह समाज उपयोगी उपक्रम वर्षभर राबवण्यात येणार आहेत. याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा दर्शना आनंद रासम यांनी केले.
सावंतवाडीत रोटरी भवन येथे झालेल्या इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या पदग्रहण सोहळ्यात अध्यक्ष म्हणून दर्शना आनंद रासम यांनी पदभार स्विकारल्यानंर त्या बोलत होत्या. यावेळी इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून इनरव्हील क्लबच्या चार्टर्ड मेंबर मृणालिनी कशाळीकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर निता गोवेकर, इनरव्हील क्लबच्या सभासद निता रेडीज, डॉ मीना जोशी, रोटरीच्या अध्यक्षा तथा डायटीशियन विनया बाड, सुहासिनी तळेगावकर, साधना रेगे, शकुन म्हापसेकर, वैभवी शेवडे, विद्या करंदीकर, भाग्यश्री कशाळकर आदी सभासद उपस्थित होते.
या इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या पदग्रहण सोहळ्यात सेक्रेटरी म्हणून भारती सचिन देशमुख, ट्रेझरर म्हणून सोनाली खोर्जुवेकर, आय एस ओ म्हणून देवता राजन हावळ तर एडिटर म्हणून सुमेधा जायबा धूरी यांनी पदभार स्वीकारला. यावेळी डॉ तृप्ती गोवेकर, संगीता शेलटकर, अँड सायली दुभाषी यांना क्लबचे सदस्यत्व प्रदान करण्यात आले.
यावेळी दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात इनरव्हील वर्ष सुरू झाल्यापासून क्लबने राबविलेल्या डॉक्टर्स डे, पर्यावरण दिन, शालेय मुलांना सीडबॉल बनवण्याचे प्रशिक्षण, १५० विद्यार्थ्याची दंत व नेत्र तपासणी शिबीर, गुरुपौर्णिमा आदी उपक्रमांचा आढावा दर्शना रासम यानी घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा