You are currently viewing *मका शेतकऱ्यासाठी रिलायंस फाऊंडेशन, कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून मार्गदर्शन*

*मका शेतकऱ्यासाठी रिलायंस फाऊंडेशन, कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून मार्गदर्शन*

सोलापूर मका उत्पादक शेतकर्यासाठी रिलायन्स फौंडेशन, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनाचा कार्यक्रम शुक्रवार ( दि . 29 ) ऑडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी येथील सुमारे 15-18 पुरुष शेतकरी ऑडीओ कॉन्फरन्स द्वारे जोडले गेले होते . या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ डॉ .दिलीप खटमळे विषय विशेषज्ञ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . यावेळी त्यांनी सांगितले की , मका पिकाची लागवडी नंतरील खत व्यवस्तापन करण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले . तसेच या कार्यक्रमासाठी रिलायन्स फौन्डेशनचे जिल्हा व्यवस्थापक तेजस डोंगरीकर ऑडीओ कॉन्फरन्स उपस्थित होते. तसेच या सर्व कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फौंडेशनचे कार्यक्रम समन्वयक आकाश जेऊरगी यांनी केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा