You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे ग्रंथालय परिचर श्री तुळशीदास मयेकर महाविद्यालयांमधुन निवृत्त

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे ग्रंथालय परिचर श्री तुळशीदास मयेकर महाविद्यालयांमधुन निवृत्त

सावंतवाडी

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील ग्रंथालय परिचर श्री तुळशीदास मयेकर हे आपल्या नियत वयोमानानुसार वयाच्या ६० व्या वर्षी महाविद्यालयांमधून निवृत्त झाले . ३२ वर्षे त्यांनी महाविद्यालयात सेवा केली. त्यांच्या निवृत्तीविषयक कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले , कार्याध्यक्षा सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले, संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ एस ए. ठाकूर ,सत्कारमूर्ती तुळशीदास मयेकर , श्री प्रवीण मांजरेकर , श्री दिनेश चव्हाण , श्री मोरेश्वर पोतनीस , महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . एस ए ठाकूर यांनी केले . राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी श्री तुळशीदास मयेकर यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले व त्याना पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला . प्रा. जी एम शिरोडकर , प्रा. टी व्ही कांबळे , प्रा. एम बी बर्गे, श्री. ज्ञानेश्वर तळकटकर, श्री दिनेश चव्हाण , श्री प्रवीण मांजरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले . तुळशीदास मयेकर हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे , कष्टाळू , मेहनती होते ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पुस्तके देताना ते आपुलकीने काम करीत . सर्वांनी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आभार प्रा. एस ए देशमुख यांनी मानले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + eighteen =