You are currently viewing शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम लवकरात-लवकर सुरू करा…विनायक राऊत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम लवकरात-लवकर सुरू करा…विनायक राऊत

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम अप्पर सचिवांकडे मागणी…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे केली. दरम्यान याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, तशा सुचना देवून काम सुरू केले जाईल, असे आश्वासन श्री.सौनिक यांनी दिले.
श्री. राऊत यांनी आज मुंबई येथे जाऊन ही भेट घेतली. सिंधुदुर्गनगरी येथे जाहीर करण्यात आलेले सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची नवी इमारत होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी प्राप्त व्हावा आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी जिल्हा वासियांची मागणी आहे. हे काम मार्गी लागल्यास जिल्ह्यातच बरेचसे उपचार होणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा जिल्ह्यातील लोकांना होणार आहे. तरी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी श्री.राऊत यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − two =