You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही: अरविंद रावराणे

आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही: अरविंद रावराणे

वैभववाडी 

आमदार नितेश राणे यांना शेतीतलं काय कळतं म्हणणाऱ्या सेनेचे लक्ष्मण रावराणे यांना पंचायत समितीमधील तरी काय कळतं का? त्यांना अभिनंदन ठरावासाठी अनुमोदक लागतो. हेदेखील माहीत नाही. त्यांनी अगोदर सरळ शुद्ध मराठी भाषा शिकून घ्यावी. आणि नंतरच एखाद्यावर टीका करण्याच्या फंदात पडावे. अशी खरमरीत टीका माजी सभापती तथा पं.स. सदस्य अरविंद रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
कणकवलीचे माजी सभापती सुरेश सावंत यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा या मागणीचे निवेदन आ. नितेश राणे यांना दिले होते. ज्यांना समस्या माहित नाहीत त्यांना निवेदन का? अशी पत्रकातून टीका लक्ष्मण रावराणे यांनी केली होती. या टीकेला अरविंद रावराणे यांनी लक्ष्मण रावराणे यांना सडेतोड उत्तर दिले आहे. लक्ष्मण रावराणे हे तालुक्यात अडीच वर्ष सभापती पदावर होते. दरम्यान सभापती दालनात अनेक ग्रामस्थ निवेदन व तक्रारी घेऊन येत होते. त्यावेळी तक्रारी ऐकून घेण्याची मनस्थिती लक्ष्मण रावांची नव्हती. फक्त देव तेका बघून घेत.. एवढेच ते त्या तक्रारदारला बोलायचे. त्या पलीकडे अडीच वर्षात ते काहीही बोलले नाहीत. सभापती पदाच्या काळात किती योजनांची त्यांनी माहिती करून घेतली. व किती प्रश्न मार्गी लावले हे आधी त्यांनी जाहीर करावे. नंतर आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करावी असे पत्रकार अरविंद रावराणे यांनी म्हटले आहे.
आ. नितेश राणे मतदारसंघात दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. ते प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांची स्वतःची ऊस शेती आहे. असे पत्रकात अरविंद रावराणे यांनी म्हटले आहे. एका मासिक सभेत लक्ष्मण राव यांनी एक अभिनंदन ठराव मांडला. पण त्या ठरावाला अनुमोदक लागतो. हे देखील त्यांना माहित नाही. हे तालुक्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. नितेश राणे यांना ऊसशेतीत काही माहित नाही म्हणणाऱ्या लक्ष्मण राव यांना उसाच्या गुळाच्या गुराळाची तरी माहिती आहे का? पं.स. अंतर्गत असलेल्या शेतीच्या योजनांची कधी त्यांनी माहिती करून घेतली का? त्यांच्या टीकेच्या बातमी मागे बोलविता धनी कोण? याची कल्पना आपल्याला आहे. पण ज्यांना सरळ मराठी बोलता येत नाही त्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. असे पत्रकात अरविंद रावराणे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 16 =