You are currently viewing काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचा मालवण काँग्रेसच्या वतीने सत्कार…

काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचा मालवण काँग्रेसच्या वतीने सत्कार…

मालवण

जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इर्शाद शेख यांचे तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नेते साईनाथ चव्हाण, अरविंद मोंडकर, संदेश कोयंडे, माजी शहराध्यक्ष जेम्स फर्नांडिस, सेवादल तालुकाध्यक्ष चंदन पांगे, बाबा मेंडीस, श्रीहरी खवणेकर, लक्ष्मीकांत परुळेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान आता होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूक आढावा घेण्यासाठी लवकरच तालुक्यात येऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊया असे प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा