You are currently viewing आई महिला केंद्रित पर्यटन धोरणांचा महिला व्यावसायिकांनी लाभ घ्यावा

आई महिला केंद्रित पर्यटन धोरणांचा महिला व्यावसायिकांनी लाभ घ्यावा

श्री विष्णू मोंडकर ,अध्यक्ष,पर्यटन व्यावसायिक महासंघ

 

मालवण :

पर्यटन हे येणाऱ्या काळात वेगाने वाढणारे क्षेत्र असून महिलांचा यामधील सहभाग त्यांच्या आर्थिक विकासासाठी साधन ठरू शकते पर्यटन क्षेत्रात महिलांचे उद्योजकता व नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी असून राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने आई महिला केंद्रित पर्यटन धोरण 23 जाहीर केले आहे. त्यामाध्यमातून पर्यटन संचालनाकडे नोंदणीकृत करून मालकी हक्काच्या व त्यांनी चालविलेल्या हॉटेल, होम स्टे, टूर एजंसी, पर्यटन प्रकल्पासाठी 15 लाख कर्जाच्या व्याजावरील रक्कम त्यांच्या आधार लिंक खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा 7 वर्षे कालावधी पर्यंत जमा करण्यात येईल.

यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने महिलासाठी धोरणा बद्दल राज्यसरकारचे अभिनंदन करीत असून या माध्यमातून जास्तीत जास्त महिला पर्यटन व्यवसायाकडे वळून आर्थिक सक्षम होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. सदर पर्यटन पूरक व्यवसाय पर्यटन संचालनाकडे नोंदणी करणे आवश्यक असून व्यवस्थापनामध्ये 50 टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक आहेत व्यवसायाच्या सर्व परवानगी असणे आवश्यक असून सदऱ कर्जाचे नियमित कर्ज भरणे गरजेचे आहे. तसेच यायोजनेमध्ये नोंदणीकृत महिलांना पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकृत टूर ऑपरेटर यांनी आयोजित टूर पॅकेज मध्ये 20 % सवलत देण्यात येईल.

तसेच आंतराष्ट्रीय महिलादीना निमित्त दरवर्षी 1 ते 8 मार्च व अन्य 22 दिवस मिळून दरवर्षी 30 दिवस पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्ट बुकींग वर 50%सवलत मिळणार आहे तसेच महिलांचा अनुभावात्मक पर्यटन वाढीसाठी विविध प्रकारची टूर आयोजित केले जाणार असून राज्यशासनाने महिला सक्षमीकरणासाठी राबविलेल्या धोरणाचा महिलानि लाभ घ्यावा तसेच यासाठी आवश्यक वाटल्यास पर्यटन महासंघाच्या महिला प्रतिनिधीशी संपर्क साधावा असे आवाहन श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा