*तुळसुली त. माणगाव, नेरूर क. नारुर, व माणगाव जि. प. मतदारसंघाची बैठक संपन्न*
केंद्रातील भाजप सरकराने गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल या वस्तूंचे भरमसाठ दर वाढविले. एवढेच नव्हे तर जीवनावश्यक असेलेल्या अन्य धांन्यावरही जीएसटी लावून सर्वसामान्य लोकांना आर्थिक संकटात टाकले आहे. मात्र यावर कोणताही भाजपचा नेता बोलत नाही. महागाई वरून जनतेचे लक्ष विचलित व्हावे यासाठी पक्ष फोडाफोडी, धार्मिक वाद, निर्माण केले जात आहेत.

निष्ठावंत शिवसैनिकांनी शिवसेना वाढविली आहे. आता शिवसेना पक्षाचा कठीण काळ सुरु आहे. या कठीण काळात सर्वांनी आपआपसातील मतभेद विसरून एकजुटीने संघटना वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोकणातील भूमीच्या कणाकणात शिवसेना भिनलेली आहे. त्यामुळे शिवसेना कोणीही संपवू शकत नाही. असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केले.

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सोमवारी तुळसुली त माणगाव जि. प. मतदारसंघाची बैठक वारंगांची तुळसुली येथे, नेरूर क नारुर जि. प. मतदारसंघाची बैठक गोठोस येथे, माणगाव जि. प. मतदारसंघाची बैठक माणगाव येथे संपन्न झाली. या बैठकांनाहि शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. यावेळी आ. वैभव नाईक यांनी शिवसेना पक्ष संघटना वाढी संदर्भात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, माजी जी. प. सदस्य राजू कविटकर, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,रुपेश पावसकर,घावनळे विभागप्रमुख रामा धुरी , माणगाव विभागप्रमुख अजित करमलकर, कौशल जोशी,रमाकांत धुरी, मथुरा राऊळ, मिलिंद नाईक, बाळा कोरगावकर, दीपक आंगणे, दिनेश वारंग, पप्पू ताम्हाणेकर, सागर म्हाडगुत, सुधाकर पडकील, प्रशांत घावनळकर, प्रसाद टिळवे, सुधीर राऊळ, बंड्या कुडतरकर, महेश जामदार, मनीषा भोसले आदी उपस्थित होते.

