You are currently viewing कसाल विभागप्रमुख पदी सचिन कदम तर विभाग संघटक पदी संदीप सावंत

कसाल विभागप्रमुख पदी सचिन कदम तर विभाग संघटक पदी संदीप सावंत

आ. वैभव नाईक यांनी केली नियुक्ती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खा. विनायक राऊत,शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांनी नव्याने स्थापन झालेल्या कसाल जिल्हापरिषद मतदार संघाच्या विभागप्रमुख पदी सचिन कदम व विभाग संघटक पदी संदीप सावंत यांची नेमणुक केली आहे. कसाल विभागात संघटनात्मक बांधणी करून शिवसेनेची ताकद वाढविण्याचे आवाहन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. तर पक्षाने दिलेल्या जबाबदारीला साजेसे काम करणार असल्याचे यावेळी सचिन कदम व संदीप सावंत यांनी सांगितले.


याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,माजी उपसभापती जयभारत पालव, तालुकाप्रमुख राजन नाईक, रुपेश पावसकर,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर,अवधूत मालणकर, छोटू पारकर,बाळा कांदळकर,डॉ. बालम, पप्पू पालव, सोशल मीडिया जिल्हा समन्वयक अनुराग सावंत, रानबांबुळी सरपंच वसंत बांबूळकर, कुंदे उपसरपंच सुशील परब, हरी वायंगणकर, विरेश परब, संतोष शिरवणकर, सुनील सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा