You are currently viewing सभासद नोंदणीचा विक्रम करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करणार

सभासद नोंदणीचा विक्रम करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करणार

आमदार वैभव नाईक यांची माहिती

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांबरोबरच शिवसेना सभासद नोंदणीचा विक्रम करून साजरा केला जाणार आहे, अशी माहिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

शिवसेनेतून आमदार खासदार फुटले असले तरी शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहेत. शिवसेनेला जनतेतूनही मोठा पाठींबा मिळत आहे. उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त सभासद नोंदणीची भेट देण्याचे आवाहन केले असून त्यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात शिवसेना सभासद नोंदणी केली जाणार आहे असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा