You are currently viewing आम. दीपक केसरकर वाढदिवसानिमित्ताने संविता आश्रमाला आर्थिक स्वरूपात मदत

आम. दीपक केसरकर वाढदिवसानिमित्ताने संविता आश्रमाला आर्थिक स्वरूपात मदत

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील पणदूर तिठा येथे जीवन आनंद संस्था संचालित संविता आश्रम पणदूर येथील ज्येष्ठ अनाथ व्यक्तिंना योग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने संस्थेचे व्यवस्थापक श्री. कांबळे कडे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने रुपये ११,०००/- रुपयांचा धनादेश सुपुर्त करत आर्थिक मदत करण्यात आली.

या कार्यक्रमाला अशोक दळवी-माजी सभापती पं.स. सावंतवाडी, प्रकाश बिद्रे-माजी उपगराध्यक्ष, सावंतवाडी नगरपालिका, गजानन नाटेकर- सदस्य संजय गांधी निराधार समिती, नारायण ऊर्फ बबन राणे- माजी पंचायत समिती सदस्य, विश्वास वाग, शैलेश मेस्त्री, एकनाथ हळदणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 7 =